Soyabean Market Rate: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सोयाबीनचे दर वाढण्यास मदत होणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयाबीनच्या गोड तेलाला तेजी आली आहे. त्यामुळे सोयाबीन च्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोयाबीनचे दर किती वाढू शकतात व कशामुळे वाढू शकतात याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
कडबा कुट्टी मशीन 100% सबसिडी योजना सुरू..! आता लगेच ऑनलाइन अर्ज करा
RTO च्या नियमात मोठा बदल; ड्रायव्हिंग लायसन्स साठी RTO मध्ये टेस्ट देणे गरजेचे नाही..
Soyabean Market Rate
त्यात देशांतर्गत तेल बियाचे उत्पादन काहीसे प्रमाणात निसर्गाच्या आपत्तीमुळे कमी झाल्याने त्याचा परिणाम देखील दिसत आहे. आपल्याकडे सरकी,.सोयाबीन, शेंगदाणा त्यालाच उत्पादन घेतले जाते. सध्या सरकी व सूर्यफूल त्याला आणि चांगली उसळी घेतली आहे. शेंगदाणा तेलाचे दर स्थिर असले तरी सर्वाधिक व्यापार असणाऱ्या सरकी तेलाच्या दरात प्रति किलो बारा रुपयाची वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत दोन्ही बाजारपेठेचा अंदाज घेतला तर एप्रिल महिन्यामध्ये ही गोड तेलाला तेजी राहण्याचा अंदाज आहे. आपल्याकडे साधारण एप्रिल मे महिन्यात पावसाळ्याची बेगमी म्हणून गोड तेलाची खरेदी करून ठेवले जाते. त्यामुळे या काळात मागणी वाढते. मात्र यंदा याच काळात तेलाला तेजी राहणार असल्याने व्यापाऱ्यांनी तेलाची खरेदी करताना सावधानता बाळगली आहे.
उर्वरित महिलेच्या खात्यावर कधी जमा होणार लाडकी बहीण योजनेचे 4,500 रुपये, देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी माहिती
सोयाबीनचे दर वाढण्यास होणार मदत..!
गेल्या दोन खरीप हंगामापासून सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत. केंद्र शासनाच्या हमीभावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री करावे लागले आहे. मात्र गोड तेलाच्या दरात वाढ होऊ लागल्याने सोयाबीनचे दर देखील वाढणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या देशात सोयाबीनचे उत्पादन कमी
ब्राझील व अर्जेंटेनिया मध्ये सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. मात्र यंदा येथे उत्पादन घटल्याचा परिणाम अंतराष्ट्रीय पातळीवर गोड त्यालाच्या दरावर झाल्याचे तज्ञाचे मत आहे.